Black Holes : ब्लॅक होलचे रहस्य विश्वाच्या अद्भुत गुढाचा शोध

Black Holes

Black Holes : मित्रांनो, ब्लॅक होल (Black Holes) बद्दल तुम्ही ऐकलं असेलच, पण ब्लॅक होल (Black Holes) म्हणजे नेमके काय हे तुम्हाला माहिती आहे का? ब्लॅक होल (Black Holes) अर्थातच काळे विवर हे खगोलशास्त्रातील सर्वाधिक गूढ गौष्टींपैकी एक मनले जाते. होरायझन टेलीस्कोपने २०१९ साली पहिल्यांदाच ब्लॅक होलचा (Black Holes) फोटो घेतला होता.

Black Holes
(AI Image)

Black Holes : मित्रांनो, ब्लॅक होल (Black Holes) बद्दल तुम्ही ऐकलं असेलच, पण ब्लॅक होल (Black Holes) म्हणजे नेमके काय हे तुम्हाला माहिती आहे का? ब्लॅक होल (Black Holes) अर्थातच काळे विवर हे खगोलशास्त्रातील सर्वाधिक गूढ गौष्टींपैकी एक मनले जाते. होरायझन टेलीस्कोपने २०१९ साली पहिल्यांदाच ब्लॅक होलचा (Black Holes) फोटो घेतला होता. वेळ, प्रकाश आणि गुरुत्वाकर्षणाचे विलक्षण ताळमेळ साधणारे हे खगोलशास्त्रीय चमत्कार वैज्ञानिकांच्या अभ्यासकांचा केंद्रबिंदू ठरले आहेत. चला तर मग ब्लॅक होल (Black Holes) अगदी थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजून घेवूया.

ब्लॅक होल (Black Holes) म्हणजे काय?

ब्लॅक होल (Black Holes) ही ब्रम्हांडातील अशी जागा आहे जिथे गुरुत्वाकर्षण इतके तीव्र असते की, प्रकाशसुद्धा त्यातून बाहेर पडू शकत नाही. याचा जन्म मोठ्या ताऱ्यांच्या स्फोटांनंतर (Supernova) होतो, असं खगोलशास्त्रज्ञ सांगतात.

काय आहेत ब्लॅक होलची (Black Holes) वैशिष्ट्ये?

इव्हेंट होरायझन (Event Horizon) : हा ब्लॅक होलचा (Black Holes) बाह्य भाग असतो. जिथून प्रकाशसुद्धा बाहेर पडू शकत नाही.

सिंग्युलॅरिटी (Singularity) : हा ब्लॅक होलचा (Black Holes) मध्यभाग असून जिथे गुरुत्वाकर्षण अनंत असते.

अॅक्रीशन डिस्क ( Accretion Disk) : तिसऱ्या क्रमांकाचे वैशिष्ट्य म्हणजे अॅक्रीशन डिस्क. ही ब्लॅक होलच्या (Black Holes) भोवती फिरणाऱ्या गरम धूळ आणि वायूच्या थरापासून बनलेली असते.

ब्लॅक होलचे (Black Holes) महत्त्व

ब्लॅक होल (Black Holes) हे ब्रम्हांडाच्या रचनेबद्दल नवी माहिती पुरवतात. त्यापासून तीव्र गुरुत्वाकर्षणाचे प्रभाव समजण्यास मदत होते. शिवाय, ब्लॅक होलमुळे (Black Holes) समांतर विश्वाचा सिद्धांत अभ्यासता येतो. अल्बर्ट आइनस्टाईन यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताद्वारे ब्लॅक होलचे (Black Holes) अस्तित्व भाकीत केले आहे.

For Reference

या विषयी तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास तुम्ही स्टीफन हॉकिंग यांचे ” A Brief History of Time” , तर किप थॉर्न यांचे “Black Holes and Time Warps” हे पुस्तक वाचू शकता.

 

समारोप

काळ्या विवरांचे अध्ययन मानवाच्या ज्ञानाची मर्यादा ओलांडून पुढे जाण्याचा मार्ग आहे. हे रहस्यमय खगोलीय घटक विज्ञान, तंत्रज्ञान आणि तत्त्वज्ञानाला नवी दृष्टी देतात. मित्रांनो, अशीच नावीन्यपूर्ण माहिती तुम्हाला रोज हवी असेल, तर आम्हाला सबस्क्राईब करा…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top