Knowledge Inshort

Current Affairs Q&A : चालू घडामोडी प्रश्नोत्तरे २८ मार्च २०२५

Current Affairs Q&A : मित्रांनो, स्पर्धा परिक्षेची तयारी करत असताना चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या विषयावर परीक्षेमध्ये साधारणतः १० ते २५ प्रश्न विचारले जातात. त्या अनुषंगाने नॉलेज इनशॉर्ट (Knowledge Inshort) च्या माध्यमातून आपण दररोजच्या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून दररोजच्या चालू घडामोडी बघूया.

Current Affairs Q&A

Current Affairs प्रश्नोत्तरे

१) इमिग्रेशन आणि फॉरेनर्स विधेयक २०२५ लोकसभेत मंजूर करण्यात आले असून त्यात देशात येणाऱ्या नागरिकाकडे वैध कागदपत्रे नसल्यास किती किती लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे?
उत्तर : १०

२) जिंदाल स्टेनलेस लिमिटेड महाराष्ट्र राज्यात किती हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे?
उत्तर : ४२,८८६

३) इमिग्रेशन आणि फॉरेनर्स विधेयक २०२५ लोकसभेत मंजूर करण्यात आले असून त्यात देशात येणाऱ्या नागरिकाकडे वैध कागदपत्रे नसल्यास किती वर्षाची शिक्षेची तरतूद आहे?
उत्तर : ७

४) महाराष्ट्र विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर : विजय वडेट्टीवार

५) इमिग्रेशन आणि फॉरेनर्स विधेयक २०२५ लोकसभेत कोणी सादर केले आहे?
उत्तर : अमित शहा

६) इमिग्रेशन आणि फॉरेनर्स विधेयक २०२५ लोकसभेत मंजूर करण्यात आले असून ते कोणत्या मंत्रालयाशी संबधित आहे?
उत्तर : गृह मंत्रालय

७) विजय वडेट्टीवार यांची महाराष्ट्र विधिमंडळाच्या कोणत्या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे?
उत्तर : रोहयो

८) महाराष्ट्र राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानाला कोणता वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे?
उत्तर : अ

९) महाराष्ट्रातील कोणत्या विमानतळाला आयएटीएकोड मिळाला आहे?
उत्तर : अमरावती

१०) महाराष्ट्र राज्य सरकारने कोणत्या जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानाला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे?
उत्तर : नाशिक

११) नाशिकमध्ये कोणत्या वर्षी सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे?
उत्तर : २०२७

१२) भारतीय स्वदेशी बनावटीच्या लुकॲप सर्च इंजिन चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
उत्तर : रक्षा खडसे

१३) कोणत्या राज्याने केंद्र सरकारच्या वक्फ दुरुस्ती विधेयक २०२४ ला विरोध करणारा ठराव मंजूर केला आहे?
उत्तर : तामिळनाडू

१४) भारतीय स्वदेशी बनावटीचे लुकॲप सर्च इंजिन कोणत्या ठिकाणच्या आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीने बनवले आहे?
उत्तर : पुणे

१५) हुरुन ग्लोबल रीच लिस्टनुसार भारतातील २८४ अब्जाधीशांकडे देशातील किती टक्के संपत्ती आहे?
उत्तर : ३३

१६) संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार भारतात २००० सालापासून ५ वर्षा पेक्षा कमी वयांच्या बालकाच्या मृत्युदरात किती टक्के घट झाली आहे?
उत्तर : ७०

१७) ३.५ लाख कोटी रुपयांच्या उत्पन्नासह कोण सर्वात श्रीमंत भारतीय महिला बनल्या आहेत?
उत्तर : रोशनी नाडर

१८) रोशनी नाडर जागतिक स्तरावर कितव्या सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत?
उत्तर : ५

१९) खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये महाराष्ट्र राज्याने कितवे स्थान पटकावले आहे?
उत्तर : ५

२०) खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये महाराष्ट्र राज्याने एकूण किती पदके जिंकली आहेत?
उत्तर : ४३

२१) खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये महाराष्ट्र राज्याने एकूण किती सुवर्ण पदक मिळवले आहेत?
उत्तर : १८

२२) खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये महाराष्ट्र राज्याने टेबल टेनिस मध्ये किती सुवर्ण पदक जिंकले आहेत?
उत्तर : ३

२३) एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप २०२५ मध्ये सुनील कुमार ने किती किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले आहे?
उत्तर : ८७

२४) ICC one Day Women world cup २०२५ चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
उत्तर : भारत

२५) खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक पदक जिंकून प्रथम स्थान पटकावले आहे?
उत्तर : हरियाणा

२६) खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये हरियाणा राज्याने सर्वाधिक किती पदके जिंकली आहेत?
उत्तर : १०४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top