Knowledge Inshort

महिलांमध्ये वाढते आजार; Diabetes, High Blood Pressure आणि Period Problems चिंतेचं कारण

हल्ली महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढत असली, तरी diabetes in women, high blood pressure, आणि menstrual health issues यांसारख्या समस्यांमुळे चिंता वाढत आहे.

diabetes

महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढत असली, तरी diabetes in women, high blood pressure, आणि menstrual health issues यांसारख्या समस्यांमुळे चिंता वाढत आहे. काही समस्या वयानुसार नैसर्गिकरीत्या उद्भवतात, तर काही जीवनशैलीतील बदलांमुळे निर्माण होतात. यामुळे महिलांनी वेळेवर निदान करून उपचार सुरू करणं आवश्यक आहे, असं gynaecologists सांगतात.

मधुमेह (Diabetes) आणि उच्च रक्तदाब (High Blood Pressure)

लक्षणं आणि उपाय
महिलांमध्ये झपाट्याने वाढत असलेल्या आजारांपैकी रक्तदाब आणि type 2 diabetes हे दोन प्रमुख आजार असल्याचे स्त्री रोग तज्ज्ञ सांगतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे वाढता ताणतणाव, अनियमित आहार आणि व्यायामाचा अभाव.

काय काळजी घ्यावी?

साखर आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी ठेवा

नियमित रक्त तपासणी करा

आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि संतुलित आहार घ्या

योगा किंवा वॉकसारखा नियमित व्यायाम करा

Women’s Health Alert: मासिक पाळीतील समस्या (Period Problems), सामान्य पण दुर्लक्षित

मासिक पाळी लांबणे, अनियमित पाळी, अतिरक्तस्राव, यांसारख्या menstrual disorders अनेक महिलांना सतावतात. हार्मोनल बदल हे मुख्य कारण असते.

काय काळजी घ्यावी?

पाळी नियमित नसेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या

स्ट्रेस मॅनेजमेंट करा

योग्य आहार आणि झोपेचा वेळ पाळा

पांढरे पाणी व इतर व्हजायनल संसर्ग (Vaginal Infections)

काही महिलांना व्हजाईनल इन्फेक्शन (Vaginal Infections) अर्थात पांढरे पाणी (White discharge) जाण्याची देखील समस्या उद्भवते आहे. यामुळे महिलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते.

काय काळजी घ्यावी?

वैयक्तिक स्वच्छता पाळा

सिंथेटिक अंडरवेअर ऐवजी कॉटनचा वापर करा

गरज असल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून औषधोपचार घ्या

स्तन आणि गर्भाशयाशी संबंधित कर्करोग (Breast & Uterine Cancer)

स्तनात गाठ येणे, गर्भाशयात समस्या उद्भवणे यासारखे gynecological cancers सुद्धा आता लवकर वयात आढळतात.

काय काळजी घ्यावी?

नियमितपणे स्तनाची स्वत: तपासणी करा

पॅप स्मिअर आणि मॅमोग्राफीसारख्या चाचण्या वेळोवेळी करून घ्या

अनियमित पाळी किंवा पेल्व्हिक पेन असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

Women’s Health Alert: महिलांनी घ्यावयाची एकूण आरोग्यदायी भूमिका

स्त्रियांमध्ये आरोग्याच्या अनेक समस्या वाढत आहेत. त्यामुळे शरीरातील लहानसहान बदलांकडे दुर्लक्ष न करता, वेळेवर निदान व उपचार करणं आवश्यक आहे. योग्य आहार, व्यायाम, नियमित तपासणी आणि मानसिक तणावावर नियंत्रण हे आरोग्य राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
– डॉ. श्यामकुमार सिरसाम, प्राध्यापक, स्त्री रोग व प्रसूती शास्त्र विभाग, जीएमसी, अकोला

( टीप : आरोग्य विषयक असेच लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा…)  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top