Current Affairs Q&A : मित्रांनो, स्पर्धा परिक्षेची तयारी करत असताना चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या विषयावर परीक्षेमध्ये साधारणतः १० ते २५ प्रश्न विचारले जातात. त्या अनुषंगाने नॉलेज इनशॉर्ट (Knowledge Inshort) च्या माध्यमातून आपण दररोजच्या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून दररोजच्या चालू घडामोडी बघूया.
Current Affairs Q&A : मित्रांनो, स्पर्धा परिक्षेची तयारी करत असताना चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या विषयावर परीक्षेमध्ये साधारणतः १० ते २५ प्रश्न विचारले जातात. त्या अनुषंगाने नॉलेज इनशॉर्ट (Knowledge Inshort) च्या माध्यमातून आपण दररोजच्या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून दररोजच्या चालू घडामोडी बघूया.
चालू घडामोडी प्रश्नोत्तरे (Current Affairs Q&A)
१) १९ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे?
उत्तर – छत्रपती संभाजीनगर
२) १९ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
उत्तर – अशोक राणा
३) ३८ व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाने कोणत्या क्रिडा प्रकारात सांघिक सुवर्ण पदक जिंकले आहे?
उत्तर – योगासन
४) ३८ व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेमध्ये दीप रांभिया व अक्षय वारंग जोडीने —— मिश्र दुहेरीत रौप्य पदक जिंकले आहे?
उत्तर – बॅडमिंटन
५) ३८ व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाने योगासनात कोणते पदक जिंकले आहे?
उत्तर – सुवर्ण
६) कोणत्या राज्य सरकारने राज्यात समान नागरी कायदा लागु करण्यासाठी समिती स्थापन केली आहे?
उत्तर – गुजरात
७) गुजरात राज्य सरकारने समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन केली आहे?
उत्तर – न्या. रंजना देसाई
८) संयुक्त राष्ट्र महासभा द्वारा दरवर्षी कोणत्या कालावधीत विश्व धर्मीय सौहाद्र सप्ताह साजरा करण्यात येतो?
उत्तर – १ ते ७ फेब्रुवारी
९) ३८ व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेमध्ये दीप रांभिया व अक्षय वारंग जोडीने बॅडमिंटन मिश्र दुहेरीत कोणते पदक जिंकले आहे?
उत्तर – रौप्य
१०) बार्ट डी वेवर यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे?
उत्तर – बेल्जियम
११) Ekuverin २०२५ सैन्य अभ्यास कोणत्या दोन देशात आयोजित करण्यात आला आहे?
उत्तर – भारत आणि मालदीव
१२) २ ते १५ फेब्रुवारी दरम्यान कोणत्या देशात Ekuverin २०२५ सैन्य अभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे?
उत्तर – मालदीव
१३) गुजरात राज्य सरकारने समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी न्या. रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील किती सदस्यीय समिती स्थापन केली आहे?
उत्तर – ५
१४) २ ते १५ फेब्रुवारी दरम्यान मालदीव मध्ये कोणत्या सैन्य अभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे?
उत्तर – Ekuverin २०२५
१५) MY NAREGA app कोणत्या राज्यातील बारमेर जिल्ह्यात लाँच करण्यात आले आहे?
उत्तर – राजस्थान
१६) भारत सरकारने विमा क्षेत्रात FDI मर्यादा किती टक्के केली आहे?
उत्तर – १००
१७) भारत सरकारने विमा क्षेत्रांतील FDI मर्यादा किती टक्के वरुन १०० टक्के इतकी
वाढवली आहे?
उत्तर – ७४
१८) केरळ मधील पश्चिम घाटात शोधण्यात आलेल्या एलेटारिया फेसिफ्रेरा आणि एलेटारिया ट्युलीपिफेरा कोणत्या मसाल्याच्या पिकाच्या नविन variteis आहेत?
उत्तर – हिरवी इलायची
१९) तांदळाच्या किमती मध्ये वाढ झाल्यामुळे कोणत्या देशात अन्न सुरक्षा आणिबाणी लागु करण्यात आली आहे?
उत्तर – फिलिपाईन्स
२०) केंद्र सरकारने जल जीवन मिशन ची मुदत किती वर्षापर्यंत वाढवली आहे?
उत्तर – २०२८
२१) BSF जम्मू फ्रंटीयर चे नवीन महानिरिक्षक कोण बनले आहेत?
उत्तर – शशांक आनंद
२२) मुंबई महानगरपालिकेने २०२५-२६ वर्षसाठी किती हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे?
उत्तर – ७४