Hyperloop test track ready : भारतातील वेगवान प्रवासाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याने IIT मद्रासने ४२२ मीटर लांबीचा पहिला हायपरलूप टेस्ट ट्रॅक विकसित केला आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे दिल्ली ते जयपूर हे ३०० किमी अंतर अवघ्या ३० मिनिटांत पार करता येईल.

Hyperloop test track ready : भारतातील वेगवान प्रवासाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याने IIT मद्रासने ४२२ मीटर लांबीचा पहिला हायपरलूप टेस्ट ट्रॅक विकसित केला आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे दिल्ली ते जयपूर हे ३०० किमी अंतर अवघ्या ३० मिनिटांत पार करता येईल.
हायपरलूप प्रकल्पाची सुरुवात ( Hyperloop test track ready)
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी X (माजी ट्विटर) वर या प्रकल्पाची घोषणा करताना लिहिले की, “सरकार आणि शैक्षणिक संस्थांचे सहकार्य भविष्यातील वाहतुकीत नाविन्य आणत आहे.” रेल्वे मंत्रालयाने हा प्रकल्प वित्तपुरवठा करून IIT मद्रास कॅम्पस येथे उभारला आहे. वैष्णव यांनी यासंदर्भात पुढे सांगितले की, “हा ४२२ मीटर लांबीचा पहिला पॉड तंत्रज्ञानाच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे भारताच्या वाहतूक प्रणालीत क्रांतिकारक बदल घडतील.”
The hyperloop project at @iitmadras; Government-academia collaboration is driving innovation in futuristic transportation. pic.twitter.com/S1r1wirK5o
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) February 24, 2025
हायपरलूप म्हणजे काय? (Hyperloop test track ready)
हायपरलूपला “पाचवा वाहतुकीचा मार्ग” असे म्हणतात. ही हाय-स्पीड ट्रान्सपोर्ट सिस्टम असून, व्हॅक्यूम ट्यूबमधून विशेष कॅप्सूल (पॉड) अविश्वसनीय वेगाने प्रवास करू शकतात.
हायपरलूपची वैशिष्ट्ये: ( Hyperloop)
इलेक्ट्रोमॅग्नेटिक लेव्हिटेशन: पॉड हवेत तरंगत असल्याने घर्षण होत नाही.
मॅक १.० पर्यंत वेग: सुमारे १२२५ किमी प्रति तास पर्यंत वेग प्राप्त करू शकतो.
इंधनाचा कमी खर्च: इंधन बचत आणि कमी कार्बन उत्सर्जन.
२x वेगवान: हायपरलूप प्रवास विमानाच्या दुप्पट वेगाने शक्य.
भारताचा पुढील हायपरलूप प्रवास ( Hyperloop)
रेल्वे मंत्रालय लवकरच पहिला व्यावसायिक हायपरलूप प्रकल्प सुरू करण्याच्या तयारीत आहे. भविष्यात हे तंत्रज्ञान दिल्ली-मुंबई, मुंबई-पुणे आणि इतर प्रमुख मार्गांवर कार्यान्वित होऊ शकते. भारताच्या प्रगतीच्या दिशेने हायपरलूप एक मोठे पाऊल आहे!