Mahagyandeep: ‘महाज्ञानदीप’ हे भारतातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल महाराष्ट्रात सुरू झाले. online education, NEP 2020 course, Indian Knowledge System Marathi मध्ये एका क्लिकवर उपलब्ध.
‘Mahagyandeep’ च्या माध्यमातून आता एका क्लिकवर मिळणार दर्जेदार शिक्षण
Mahagyandeep: महाराष्ट्र सरकारने ‘महाज्ञानदीप’ या देशातील पहिल्या Digital Education Portal ला सुरुवात केली आहे. शिक्षण क्षेत्रातील हे एक ऐतिहासिक पाऊल ठरले असून या पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मराठीतून दर्जेदार online education एका क्लिकवर सहज उपलब्ध होणार आहे.
डिजिटल शिक्षण (Digital Education) क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, महाराष्ट्रात देशातील पहिले online education portal ‘महाज्ञानदीप’ सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘महाज्ञानदीप’ पोर्टलचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. यावेळी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेश देवळाणकर, तसेच विविध विद्यापीठांचे कुलगुरू, प्राध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञ उपस्थित होते.
‘महाज्ञानदीप’ पोर्टलची वैशिष्ट्ये
या पोर्टलच्या माध्यमातून e-learning in Marathi शक्य होणार असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षण सहज मिळणार आहे. NEP 2020 अंतर्गत तयार करण्यात आलेला Indian Knowledge System (IKS) Generic अभ्यासक्रम मराठीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम महाराष्ट्रातील १५० प्रशिक्षित प्राध्यापकांनी तयार केला असून तो ‘महाज्ञानदीप’ पोर्टलवर अपलोड केला गेला आहे.
जगभरातील मराठी भाषिक व अभ्यासक यांना उपलब्ध असेल, अशा प्रकारचे डिजीटल शिक्षणाचे पोर्टल शासनाच्या अधिपत्याखाली देशात प्रथमच महाराष्ट्राच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ‘महाज्ञानदीप पोर्टल’ म्हणून निर्माण केले आहे.
आज मंत्रालय, मुंबई येथे माझ्या हस्ते या पोर्टलचे उद्घाटन करण्यात… pic.twitter.com/8pLBjOjW02— Chandrakant Patil (@ChDadaPatil) April 16, 2025
या विद्यापीठांमध्ये Mahagyandeep चा होणार वापर
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
मुंबई विद्यापीठ
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई
तंत्रज्ञानाद्वारे शिक्षणात समावेश
‘महाज्ञानदीप’ या digital learning platform चा उद्देश आहे शिक्षण क्षेत्रात technology integration वाढवणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या मोबाईल किंवा संगणकावरून दर्जेदार शिक्षण देणे.