Knowledge Inshort

MPSC Exams in Marathi : एमपीएससीच्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीत !

MPSC Exams in Marathi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत राज्यात एमपीएससीच्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीत घेण्याची योजना राज्य सरकार करत असल्याची माहिती दिली.

MPSC Exams in Marathi

MPSC Exams in Marathi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत राज्यात एमपीएससीच्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीत घेण्याची योजना राज्य सरकार करत असल्याची माहिती दिली.

विधानपरिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी एमपीएससीच्या परीक्षा मराठीत घेण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. याला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, सध्या अभियांत्रिकी आणि कृषी तांत्रिक पदांच्या परीक्षा इंग्रजीत घेतल्या जातात, कारण संबंधित पुस्तके मराठीत उपलब्ध नाहीत. मात्र, आता अभियांत्रिकी शिक्षण मराठीत घेण्यास परवानगी मिळाल्याने लवकरच या अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीत उपलब्ध होतील. त्यानुसार, सर्व तांत्रिक पदांच्या परीक्षा मराठीत घेण्याचे नियोजन राज्य शासनाने केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top