Gaganyaan (G1) mission: गगनयान (G1) मोहीम ही इस्रोच्या महत्त्वकांक्षी मोहिमांपैकी एक आहे. या मोहिमेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. क्रू नसलेली गगनयान (G1) ही इस्रोची पहिली मोहीम आहे. या मोहिमेसाठी क्रू मॉड्यूल तयार करण्याच्या दिशेने इस्रोच्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटर (LPSC) ने २१ जानेवारी २०२५ रोजी महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे.
Gaganyaan (G1) mission: गगनयान (G1) मोहीम ही इस्रोच्या महत्त्वकांक्षी मोहिमांपैकी एक आहे. या मोहिमेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. क्रू नसलेली गगनयान (G1) ही इस्रोची पहिली मोहीम आहे. या मोहिमेसाठी क्रू मॉड्यूल तयार करण्याच्या दिशेने इस्रोच्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटर (LPSC) ने २१ जानेवारी २०२५ रोजी महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. गगनयान मोहिमेतील हा टप्पा इस्रोच्या वैज्ञानिक कौशल्याचे प्रतीक असून, भारताच्या अंतराळ मोहिमांसाठी महत्त्वपूर्ण आहे. लिक्विड प्रोपल्शन सिस्टीमचे एकत्रीकरण आणि त्यातील तांत्रिक प्रगती गगनयानच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी मार्ग मोकळा करेल. मॉड्यूलवर एव्हियोनिक्स पॅकेज असेंब्ली, इलेक्ट्रिकल हार्नेसिंग, आणि अंतिम तपासणीचे काम VSSC मध्ये केले जाईल. यानंतर, हे मॉड्यूल यू आर राव उपग्रह केंद्र (बंगळुरू) येथे ऑर्बिटल मॉड्यूलच्या एकत्रीकरणासाठी पाठवले जाईल.
क्रू मॉड्यूल प्रोपल्शन सिस्टमची वैशिष्ट्ये (Gaganyaan (G1) mission)
क्रू मॉड्यूल प्रोपल्शन सिस्टम (CMPS) ही एक द्वि-प्रोपेलंट आधारित रिएक्शन कंट्रोल सिस्टम (RCS) आहे. ही प्रणाली मॉड्यूलच्या ३ मुख्य अक्षांवर – पिच, याव, आणि रोल – अचूक नियंत्रणासाठी डिझाइन केली आहे.
डिसेंट आणि री-एंट्री टप्प्यात, पॅराशूट-आधारित डिसिलरेशन सिस्टम सुरू होईपर्यंत क्रू मॉड्यूलचे नियंत्रण CMPS वर अवलंबून असेल.
या प्रणालीत १२ थ्रस्टर्स (१०० एन क्षमता), उच्च दाबाच्या गॅस बाटल्या, प्रेशरायझेशन सिस्टम, आणि प्रोपेलेंट फीड सिस्टम यांचा समावेश आहे.
क्रू मॉड्यूलमध्ये क्रू मॉड्यूल अपराइटिंग सिस्टम (CMUS) ही विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) द्वारे डिझाइन केलेली प्रणाली देखील समाविष्ट करण्यात आली. यामुळे मॉड्यूलची स्थिरता आणि कार्यक्षमतेत वाढ होईल.
महत्त्वाचे : अधिक माहितीसाठी इस्रो (ISRO)च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.