Mahakumbh Mela from space: नासाचे अंतराळवीर डॉन पेटिट यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) महाकुंभमेळ्याचे अप्रतिम फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रकाशित प्रयागराजचे अप्रतिम सौंदर्य आणि गंगा, यमुना, आणि पौराणिक सरस्वती नद्यांचा संगम विशेषतः उठून दिसतो.
Mahakumbh Mela from space: नासाचे अंतराळवीर डॉन पेटिट यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) महाकुंभमेळ्याचे अप्रतिम फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रकाशित प्रयागराजचे अप्रतिम सौंदर्य आणि गंगा, यमुना, आणि पौराणिक सरस्वती नद्यांचा संगम विशेषतः उठून दिसतो. डॉन पेटिट यांनी खगोल छायाचित्रणासाठी प्रसिद्ध X (पूर्वीचे Twitter) वर लिहिले, “२०२५ महाकुंभमेळा, गंगा नदीच्या तीर्थयात्रेचे आयएसएसवरून घेतलेले चित्र. जगातील सर्वात मोठ्या मानवी मेळाव्याचे हे अद्भुत दृश्य आहे.”
२०२५ चा महाकुंभमेळा फक्त भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. डॉन पेटिट यांच्यासारख्या अंतराळवीरांनी या मेळ्याचे अवकाशातून टिपलेले फोटो केवळ त्याच्या भव्यतेचे दर्शन घडवत नाहीत, तर या कार्यक्रमाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाची ओळखही जागतिक स्तरावर पोहोचवत आहेत.
2025 Maha Kumbh Mela Ganges River pilgrimage from the ISS at night. The largest human gathering in the world is well lit. pic.twitter.com/l9YD6o0Llo
— Don Pettit (@astro_Pettit) January 26, 2025
महाकुंभमेळ्याचे ऐतिहासिक महत्त्व (Mahakumbh Mela from space)
महाकुंभमेळ्याचे ऐतिहासिक महत्त्व (Mahakumbh Mela from space)
महाकुंभमेळा दर १२ वर्षांनी आयोजित केला जातो, परंतु प्रयागराजमध्ये दर १४४ वर्षांनी विशेष महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. यंदा हा मेळा १३ जानेवारी २०२५ पासून सुरू झाला असून, ४५ दिवस चालणार आहे. लाखो भक्त, संत, आणि पर्यटक या मेळ्यात सहभागी होतात.
उत्तर प्रदेश सरकारचे महाकुंभ तयारीत विशेष योगदान (Mahakumbh Mela from space)
महाकुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने ४०० कोटी रुपयांची तरतूद करून प्रगत पायाभूत सुविधांची उभारणी केली आहे. तसेच वीजेचे खास व्यवस्थापन केले. यामध्ये प्रामुख्याने ८५ उपकेंद्रांद्वारे ४,००० हेक्टर क्षेत्रफळावर प्रकाश टाकण्यासाठी ५२,००० विजेचे खांब आणि ७०,००० एलईडी दिवे बसवले आहेत. याशिवाय, २,०१६ सौर हायब्रिड दिवे मुख्य रस्त्यांच्या कडेला बसवण्यात आले आहेत, जे स्वयंचलित पद्धतीने चालू-बंद होतात.
१.६ लाख तंबू, ५० हजारावर उभारले दुकाणे
महाकुंभमेळ्यात भाविकांसाठी १.६ लाख तंबू आणि ५०,००० दुकाने उभारण्यात आले आहेत, ज्यामुळे भाविकांना उत्तम सेवा मिळत आहे.
अंतराळातून टिपलेले महाकुंभचे विशेष क्षण
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून उच्च-शक्तीच्या कॅमेऱ्यांनी टिपलेले हे फोटो महाकुंभमेळ्याच्या भव्यतेचे जगभरात दर्शन घडवतात. डॉन पेटिट यांच्यासोबत सुनीता विल्यम्स आणि बॅरी विलमोरसुद्धा ISS वर महत्त्वाच्या मिशनमध्ये सहभागी आहेत.