Acrobat AI Assistant : Adobe ने आपल्या Acrobat AI Assistant मध्ये नवीन AI फीचर्स जोडले आहेत, ज्यामुळे वापरकर्त्यांना कॉन्ट्रॅक्ट (करार) समजून घेणे आणि त्याचे विश्लेषण करणे सोपे होईल. या फीचर्समुळे युजर्स आता दस्तऐवजांची तुलना करू शकतील, शिवाय त्यातील फरक ओळखून माहिती पटकन पडताळू शकतील.

काय आहेत नवे बदल? (Acrobat AI Assistant)
Adobe च्या मते, हा AI Contract Intelligence तंत्रज्ञानाचा वापर करतो, जो स्वयंचलितपणे करार ओळखतो आणि त्यातील महत्त्वाच्या अटी आणि शिफारसींसह एक संक्षिप्त आढावा तयार करतो. हे स्कॅन केलेल्या दस्तऐवजांवरही कार्य करते, त्यामुळे कागदपत्रांचा डिजिटल स्वरूपात तपास करणे सोपे होते. याशिवाय, हा AI असिस्टंट सर्व भागधारकांना एकाच अॅपमध्ये ई-साइन करण्याची सुविधा देखील देते. Acrobat AI Assistant हे एक ऐड-ऑन सेवा म्हणून उपलब्ध असेल, ज्याची किंमत $4.99 प्रति महिना आहे. हे डेस्कटॉप, वेब आणि मोबाइल प्लॅटफॉर्मवर जागतिक स्तरावर उपलब्ध असेल.
Adobe Document Cloud चे वरिष्ठ उपाध्यक्ष अभिज्ञान मोदी म्हणाले, “दरमहा, ग्राहक Adobe Acrobat मध्ये अब्जावधी करार उघडतात. AI मुळे हा अनुभव अधिक सुलभ होऊ शकतो. आम्ही Acrobat AI Assistant मध्ये Contract Intelligence जोडत आहोत, ज्यामुळे ग्राहकांना जटिल दस्तऐवज समजून घेणे, त्यांची तुलना करणे आणि त्यांचा डेटा सुरक्षित ठेवून योग्य निर्णय घेणे सोपे होईल.”