Knowledge Inshort

Quantum Science and Technology : महाराष्ट्र साजरे करणार आंतरराष्ट्रीय क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष

Quantum Science and Technology : युनेस्कोने २०२५ हे आंतरराष्ट्रीय क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान (Quantum Science and Technology) वर्ष म्हणून साजरे करणार आहे. महाराष्ट्र सरकारने देखील यासाठी पुढाकार घेतला असून यासाठी युनेस्कोचे सहकार्य घेणार आहे. या विषयी राज्याचे तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी माहिती दिली.

Quantum Science and Technology
महाराष्ट्र साजरे करणार आंतरराष्ट्रीय क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष (Image Source : UNESCO)

Quantum Science and Technology :  युनेस्कोने २०२५ हे आंतरराष्ट्रीय क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान (Quantum Science and Technology) वर्ष म्हणून साजरे करणार आहे. महाराष्ट्र सरकारने देखील यासाठी पुढाकार घेतला असून यासाठी युनेस्कोचे सहकार्य घेणार आहे. या विषयी राज्याचे तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी माहिती दिली. हा उपक्रम संयुक्त राष्ट्रांनी क्वांटम मेकॅनिक्सच्या शताब्दी वर्षानिमित्त घोषित केला आहे.

क्वांटम तंत्रज्ञानातील महाराष्ट्राची भूमिका (Quantum Science and Technology)

क्वांटम विज्ञानाच्या संशोधन, नवोन्मेष आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकार वचनबद्ध आहे. नोबेल विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ वर्नर हायझेनबर्ग यांनी मांडलेल्या आधुनिक क्वांटम मेकॅनिक्सच्या शतकपूर्तीनिमित्त हा उपक्रम राबवला जात आहे.

“विकसित भारत २०४७” सोबत सुसंगत उपक्रम (Quantum Science)

हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “विकसित भारत २०४७” दृष्टिकोनाशी सुसंगत असल्याची माहिती मंत्री शेलार यांनी दिली. २०२३ मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय क्वांटम मिशन सुरू करून देशाच्या क्वांटम क्षेत्रात नवसंशोधनाला चालना दिली. महाराष्ट्र या तंत्रज्ञानात आघाडीवर राहण्यासाठी जागतिक आणि राष्ट्रीय संस्थांशी सहकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.

क्वांटम शिक्षण आणि संशोधनाला चालना (Quantum Education)

महाराष्ट्र सरकार क्वांटम तंत्रज्ञान क्षेत्रातील कौशल्यवृद्धीसाठी विविध परिषदा, कार्यशाळा आणि तज्ज्ञ व्याख्याने आयोजित करणार आहे. हा उपक्रम विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, राष्ट्रीय क्वांटम मिशन आणि शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने राबवला जाईल.

बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठासोबत भागीदारी

राज्य सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठासोबत क्वांटम तंत्रज्ञान कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्याची योजना आखत आहे. याशिवाय, ‘क्वांटम सेंटर ऑफ एक्सलन्स लॅब’ स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारसोबत चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्रातील पहिल्या AI विद्यापीठाचा सहभाग

महाराष्ट्रातील पहिल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) विद्यापीठाने आपल्या अभ्यासक्रमात आधीच क्वांटम तंत्रज्ञानाचा समावेश केला आहे. तसेच, महाराष्ट्र AI पॉलिसी टास्क फोर्स आणि सायबरसुरक्षा पॉलिसी टास्क फोर्स क्वांटम तंत्रज्ञानाचा भविष्यातील परिणामांचा अभ्यास करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top