Current Affairs Q&A : मित्रांनो, स्पर्धा परिक्षेची तयारी करत असताना चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या विषयावर परीक्षेमध्ये साधारणतः १० ते २५ प्रश्न विचारले जातात. त्या अनुषंगाने नॉलेज इनशॉर्ट (Knowledge Inshort) च्या माध्यमातून आपण दररोजच्या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून दररोजच्या चालू घडामोडी बघूया.
Current Affairs Q&A : मित्रांनो, स्पर्धा परिक्षेची तयारी करत असताना चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या विषयावर परीक्षेमध्ये साधारणतः १० ते २५ प्रश्न विचारले जातात. त्या अनुषंगाने नॉलेज इनशॉर्ट (Knowledge Inshort) च्या माध्यमातून आपण दररोजच्या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून दररोजच्या चालू घडामोडी बघूया.
चालू घडामोडी प्रश्नोत्तरे (Current Affairs Q&A)
१) RBI च्या पतधोरण समितीने पाव टक्का कमी करून किती टक्के केला आहे?
उत्तर : ६.२५
२) पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाच्या २ दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत?
उत्तर : अमेरिका
३) IVF तंत्रज्ञानाचा वापर करून कोणत्या प्राण्याचा भ्रूण तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे?
उत्तर : कांगारू
४) केंद्रिय मंत्रीमंडळाने कौशल्य भारत कार्यक्रमासाठी किती हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत?
उत्तर : ८८००
५) केंद्रिय मंत्रीमंडळाने कौशल्य भारत कार्यक्रम किती वर्षापर्यंत चालू ठेवण्यास मंजूरी दिली आहे?
उत्तर : २०२६
६) ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत टेनिस मध्ये महाराष्ट्र राज्याच्या महिला संघाने कोणत्या राज्याला पराभव करून सांघिक सुवर्ण पदक जिंकले आहे?
उत्तर : गुजरात
७) यंदाच्या रब्बी हंगामात महाराष्ट्र राज्यात मक्याची लागवड दुपट्टीने वाढून किती लाख हेक्टर वर गेली आहे?
उत्तर : ४.८४
८) राष्ट्रीय खाद्यतेल अभियान कोणत्या कालावधीत राबविण्यात येणार आहे?
उत्तर : २०२४-२५ ते २०३०-३१
९) कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयावर निर्बंध घालण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे?
उत्तर : अमेरिका
१०) ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणत्या खेळामध्ये महाराष्ट्र राज्याच्या महिला संघाने सांघिक सुवर्ण पदक जिंकले आहे?
उत्तर : टेनिस
११) आगामी आर्थिक वर्ष २०२६ मध्ये भारताची अर्थव्यवस्था किती टक्के विकासदर गाठेल असा अंदाज RBI ने वर्तविला आहे?
उत्तर : ६.७
१२) महाराष्ट्र शासनाचा २०२४ वर्षाचा विं दा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
उत्तर : रा रं बोराडे
१३) महाराष्ट्र शासनाचा डॉ.अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार २०२४ कोणाला जाहीर झाला आहे?
उत्तर : डॉ. रमेश सूर्यवंशी
१४) महाराष्ट्र राज्य सरकारने मराठी भाषा संवर्धन पुरस्कार २०२४ कोणाला घोषित केला आहे?
उत्तर : मराठवाडा साहित्य परिषद
१५) देशांतील पहिले प्री मॅरेज कौन्सिलिंग सेंटर कोठे सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे?
उत्तर : नाशिक
१६) डिजिटल पेमेंटमध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी RBI ने कधी पासून बँकांसाठी बँक डॉट इन हे विशेष इंटरनेट डोमेन सुरु करण्याची घोषणा केली आहे?
उत्तर : एप्रिल २०२५
१७) RBI ने २०२५-२६ वर्षांसाठी किरकोळ महागाई दर किती टक्के राहील असा अंदाज वर्तविला आहे?
उत्तर : ४.२
१८) कोणत्या देशातील टीम अँड्र्यूज हे डुकराच्या किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण झालेले दुसरे व्यक्ती ठरले आहेत?
उत्तर : इंग्लंड
१९) ३८ व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याने तिरंदाजी मध्ये किती सुवर्ण पदके जिंकली आहेत?
उत्तर : ३
२०) भारताने सौर ऊर्जा क्षमतेमध्ये किती गिगावॅटचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे?
उत्तर : १००
२१) FEAST २०२५ सॉफ्टवेअर कोणी लाँच केले आहे?
उत्तर : ISRO
२२) भारताची जगात मोबाईल निर्माण करण्यात कितवे स्थान आहे?
उत्तर : २
२३) कोणत्या मंत्रालयाने शतावरी फॉर बेटर हेल्थ अभियान लाँच केले आहे?
उत्तर : आयुष मंत्रालय
२४) जागतिक आरोग्य संघटनेने इबोला लसीचे ट्रायल कोणत्या देशात सुरु केले आहे?
उत्तर : युगांडा