Current Affairs Q&A : मित्रांनो, स्पर्धा परिक्षेची तयारी करत असताना चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या विषयावर परीक्षेमध्ये साधारणतः १० ते २५ प्रश्न विचारले जातात. त्या अनुषंगाने नॉलेज इनशॉर्ट (Knowledge Inshort) च्या माध्यमातून आपण दररोजच्या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून दररोजच्या चालू घडामोडी बघूया.
Current Affairs Q&A : मित्रांनो, स्पर्धा परिक्षेची तयारी करत असताना चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या विषयावर परीक्षेमध्ये साधारणतः १० ते २५ प्रश्न विचारले जातात. त्या अनुषंगाने नॉलेज इनशॉर्ट (Knowledge Inshort) च्या माध्यमातून आपण दररोजच्या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून दररोजच्या चालू घडामोडी बघूया.
चालू घडामोडी प्रश्नोत्तरे (Current Affairs Q&A)
१) दिल्ली मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुक २०२५ मध्ये कोणत्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत?
उत्तर : BJP
२) नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने किती जागा जिंकल्या आहेत?
उत्तर : २२
३) एअरो इंडिया हवाई प्रदर्शन २०२५ कोठे सुरु होत आहे?
उत्तर : बंगळुरू
४) दिल्ली विधानसभा निवडणुक २०२५ मध्ये भारतीय जनता पक्षाने किती जागा जिंकल्या आहेत?
उत्तर : ४८
५) दिल्ली विधानसभेमध्ये एकून किती जागेसाठी निवडणूक पार पडली?
उत्तर : ७०
६) दोन दिवसीय AI शिखर परिषद कोणत्या देशात सुरु होत आहे?
उत्तर : फ्रान्स
७) ३८ व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याची धावपटू सूदेश्णा शिवणकर हिने कोणते पदक जिंकले आहे?
उत्तर : सुवर्ण
८) दिल्ली विधानसभा निवडणुक २०२५ मध्ये आम आदमी पार्टीला किती टक्के मते मिळाली आहेत?
उत्तर : ४३
९) फ्रान्स मध्ये होणाऱ्या दोन दिवसीय AI शिखर परिषदेला भारतातर्फे कोण उपस्थित राहणार आहेत?
उत्तर : नरेंद्र मोदी
१०) दिल्ली विधानसभा निवडणुक २०२५ मध्ये भारतीय जनता पक्षाला किती टक्के मतदान झाले आहे?
उत्तर : ४६
११) एन.बिरेन सिंह यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे?
उत्तर : मणिपूर
१२) दर दोन वर्षांनी होणारे एअरो इंडिया हवाई प्रदर्शन या वर्षी बंगळुरू येथे कोणत्या कालावधीत होणार आहे?
उत्तर : १० ते १४ फेब्रुवारी
१३) दिल्ली विधानसभा निवडणुक २०२५ मध्ये काँग्रेस पक्षाला किती टक्के मतदान झाले आहे?
उत्तर : ६.५
१४) भारतीय जनता पक्ष दिल्ली विधानसभेत किती वर्षांनी सत्तेत आला आहे?
उत्तर : २७
१५) एकदिवसीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा रोहित शर्मा कितवा फलंदाज ठरला आहे?
उत्तर : दुसरा
१६) एकदिवसीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजामध्ये कोण अव्वल स्थानावर आहे?
उत्तर : शाहिद आफ्रिदी
१७) एकदिवसीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या फलंदाजामध्ये रोहित शर्माने कितवे स्थान पटकावले आहे?
उत्तर : ३
१८) ३८ व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या तेजस शिरसे ने कोणते पदक जिंकले आहे?
उत्तर : सुवर्ण
१९) उत्तर भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लॅन्ट कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे?
उत्तर : हिमाचल प्रदेश
२०) ३८ व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या तेजस शिरसे ने किती मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकले आहे?
उत्तर : १००
२१) कोणत्या राज्य सरकारने विकसित गाव योजना सुरू केली आहे?
उत्तर : ओडिशा
२२) बिमस्टेक युथ समिट २०२५ कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली आहे?
उत्तर : गुजरात
२३) FIFA ने कोणत्या देशाच्या फुटबॉल महासंघाला निलंबित केले आहे?
उत्तर : पाकिस्तान
२४) एशियन विंटर गेम्स २०२५ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे?
उत्तर : चीन
२५) SA २० लीग चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे?
उत्तर : MI केप टाऊन
२६) SA २० लीग चे विजेतेपद MI केप टाऊन संघाने पटकावले असून त्यांचा कर्णधार कोण आहे?
उत्तर : राशिद खान