Knowledge Inshort

झोपेत श्वसनाचा त्रास होतोय? हा असू शकतो Obstructive Sleep Apnea!

Obstructive Sleep Apnea हा एक गंभीर झोपेचा विकार असून योग्य उपचार न घेतल्यास तो प्राणघातक ठरू शकतो. जाणून घ्या Sleep Apnea symptoms, कारणे आणि उपचार याबाबत संपूर्ण माहिती.

Obstructive Sleep Apnea

लक्ष द्या…! तुमच्याही घरात असू शकतो Obstructive Sleep Apnea ग्रस्त व्यक्ती!

झोपेमध्ये श्वसन मार्गावर दाब निर्माण झाल्याने शरीरातील oxygen level कमी होतो आणि त्यामुळे हृदयावर ताण येतो. हा त्रास वारंवार झाला, तर ते Obstructive Sleep Apnea (OSA) या गंभीर झोपेच्या विकाराचे (serious sleep disorder) लक्षण असू शकते. अनेक वेळा असा रुग्ण आपल्या घरात असतो, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे झोपेत श्वास घेण्यास त्रास होणे, घोरणं, थकवा जाणवणे अशी लक्षणं दिसल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

अनेक वेळा अचानक झोपेत मृत्यू झाल्याच्या घटना आपण ऐकतो, आणि यामागे अनेकदा हेच कारण असते. प्रसिद्ध संगीतकार बप्पी लाहिरी यांचे निधनदेखील याच आजारामुळे झाल्याचे डॉक्टर सांगतात. दुर्दैवाने, Sleep Apnea symptoms अनेकांना असतात, पण सामान्य लक्षणं समजून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्यास तो आजार जीवावर बेतू शकतो.

Obstructive Sleep Apnea होण्याची कारणे

लठ्ठपणा (Obesity)

मानेभोवती चरबीचे प्रमाण अधिक असणे

खालचा जबडा लहान असणे

मोठ्या आकाराची जीभ

Enlarged tonsils किंवा adenoids

धूम्रपान व मद्यपान

झोपेच्या गोळ्यांचा वापर

आदी कारणांमुळे झोपेत श्वास घेण्यास अडथडा येतो आणि त्यामुळे sleep apnea episodes चे प्रसंग निर्माण होतात.

तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला खालील लक्षणं जाणवत असतील का?

झोपेत जोराने घोरणे (snoring)

श्वास घेण्यास अडथळा येणे

वारंवार झोपेतून दचकून जाग येणे

तोंड कोरडे पडणे

झोपेमध्ये अनैच्छिक मूत्रविसर्जन

दिवसभर थकवा, चिडचिड, कामात लक्ष न लागणे

वाहन चालवताना झोप येणे (sleepiness while driving)

ही सर्व लक्षणे sleep apnea disorder कडे निर्देश करत असू शकतात.

निदान आणि उपचार (Diagnosis & Treatment of Sleep Apnea)

या आजाराचे निदान करण्यासाठी Sleep Study (Polysomnography) हा अत्यंत उपयुक्त उपाय आहे.
तपासणीनंतर जर आजाराची तीव्रता जास्त असेल, तर CPAP (Continuous Positive Airway Pressure) हे यंत्र वापरण्यात येते. यामध्ये हवेचा झोत श्वसन मार्गामध्ये दिला जातो, ज्यामुळे मानेवरील दाब कमी होतो आणि oxygen supply नियमित राहतो.

प्रत्येक घरात असू शकतो OSA रुग्ण
‘Obstructive Sleep Apnea’ हा सामान्य असला तरी अलक्षित राहिल्यास गंभीर परिणाम करू शकतो. अनेक कुटुंबांमध्ये कोणीतरी या लक्षणांनी त्रस्त असतो, पण दुर्लक्ष झाल्याने परिस्थिती बिघडते. म्हणून, झोपेमध्ये घोरणे किंवा दम लागणे ही सामान्य गोष्ट नाही, तर ती potentially life-threatening condition ठरू शकते.

डॉ. सागर थोटे, छाती व फुप्फुस रोग तज्ज्ञ, अकोला

अधिक वाचा : (आरोग्याशी संबंधित आणखी उपयुक्त लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top